आफ्रिकेच्या एडन मार्क्रमने घेतला जबरदस्त कॅच, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका संघात रावळपिंडी येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानी टीमची सुरुवात फारच वाईट झाली. दक्षिण आफ्रिकेची जबरदस्त गोलंदाजी व फिल्डिंगने पाकिस्तानी फलंदाजांची दाणादाण उडवली होती.

पाकिस्तानचे फलंदाज डगमगत फलंदाजी करत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा फिल्डर एडन मार्क्रम याने आबीद अली याचा जबरदस्त कॅच घेतला. त्याने ज्या प्रकार कॅच घेतला ते पाहून कॉमेंटेटर, प्रेक्षकांसोबत पाकिस्तानी फलंदाज पण चकीत झाला. त्याच्या या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्वत: पाकिस्तानी क्रिकेटबोर्डाने देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना कराचीमध्ये झाला होता. तो कसोटी सामना पाकिस्तानने जिंकलेला. पाकिस्तानने गेल्या 17 वर्षात आफ्रिकेविरोधात एकही मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे घरातल्या मैदांनांवर सुरू असलेली ही मालिका जिंकून पाकिस्तानला हा खराब इतिहास पुसायचा आहे.

या टेस्ट सिरीजनंतर पाकिस्तान व आफ्रिकेत तीन टी-20 सामने होणार आहेत. पहिला सामना 11 फेब्रुवारी, दुसरा 13 फेब्रुवारी व तिसरा 14 फेब्रुवारीला होणार आहे.