
देशात सध्या लगीनसराई सुरू आहे. अशातच मथुरा येथे एका बैलाच्या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली. बैलाची वरात बघून तर सारेच दंग झाले. चक्क नवरदेवाप्रमाणे सजलेला, डोक्याला फेटा बांधून निघालेला बैल आणि बँडच्या तालावर नाचणारे वऱहाडी हे दृश्य बघून नेमकं चाललंय का हेच कुणाला समजत नव्हते. पण बैलाची वरात निघाल्येय हे समजल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघ्यांनी एकच गर्दी केली. राया प्रांतातील एका गावात गाय-बैलाच्या लग्नासाठी खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. साऱया पंचक्रोशीत या लग्नाचीच चर्चा आहे. नंदीबाबा आणि नंदीमातेचा विवाह धुमधडाक्यात करून आम्ही समस्त देवतांची पूजा करत असल्याचे लग्नाच्या आयोजकांनी सांगितले.























































