
लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून देवरुख एसटी आगारातील चालकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेचे वृत्त देवरुख आगारात समजताच कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली .
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत धनंजय दीपक नामे (33) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नांव आहे. नामे यांचे मूळ गांव लांजा तालुक्यातील पालू . नोकरी निमित्ताने ते गेली काही वर्षे देवरुख येथे वास्तव्याला होते. धनंजय हे आई समवेत देवरुख येथे भाड्याच्या खोलीत रहात होते . याच ठिकाणी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली .
याबाबत ॲड. पूनम चव्हाण यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनंजय यांच्या आईचा जबाब नोंदवण्यात आला आहे . लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे . घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. धनंजय यांच्या पश्चात आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे . याबाबत अधिक तपास हे कॉ. डी. एस. पवार हे करीत आहेत .


























































