
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्याप्रसंगी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. मेहता हे तीन वेळा बोरिवली विधानसभेत भाजपा आमदार होते.



























































