धक्कादायक! शिक्षिका व विद्यार्थिनीमध्ये समलैंगिक संबंध उघड, शाळेतच सुरू होते अश्लील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे जगातल्या उत्कृष्ट नात्यांपैकी एक मानलं जातं. पण, शिक्षिकेचे विद्यार्थिनीसोबतचे समलैंगिक संबंध उघड झाले असून विद्यार्थिनीसोबत शाळेतच अश्लील प्रकार करत असल्याचंही वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे.

हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उघडकीस आला आहे. हेली हॉलमार्क असं या शिक्षिकेचे नाव आहे. एका विद्यार्थ्याने ती एका विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी शाळा प्रशासनाने कारवाई करत तिची पोलिसात तक्रार केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी शिक्षिकेला अटक करून ओकालोसा कारागृहात ठेवले आहे.

याबाबत त्या विद्यार्थिनीला विचारले असता तिने शिक्षिकेसोबत समलैंगिक संबध असल्याचे मान्य केलं आहे. त्याबाबत सांगताना तिने म्हटलं 2017च्या ऑगस्टपासून म्हणजेच ती आठवीला असल्यापासून तिचे शिक्षिकेशी समलैंगिक संबध आहेत.

सुरुवातीला त्या दोघी एकमेकींशी मेसेजवर बोलायच्या. हळूहळू त्यांच्या मेसेज वाढू लागले आणि त्यांची मजल सेक्स चॅटपर्यंत गेली. 2018 साली त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीत त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाले. यात बऱ्याचदा त्यांच्यात वर्गात संबंध झाले आणि काहीवेळेला शिक्षिकेच्या घरी झाले. याबाबत त्यांच्या फोनमधून मिळालेल्या माहितीवरून विद्यार्थिनीचा जबाब खरा असल्याचं स्पष्ट झालं.

हॉलमार्क ही निकविल्ले येथील रुकेल मिडेल शाळेत इतिहास विषय शिकवायची. ती डान्स प्रशिक्षकही होती. त्याचबरोबर मुलींच्या सॉकर टीमची सहप्रशिक्षकही होती. 2011 साली पेन्साकोला येथे काम करत असताना तिला एस्कॅम्बिया काऊंटीच्या वर्षाचे देशाचा सोशल स्टडिज टिचरचा अॅवॉर्ड मिळाला.