उत्तराखंड दुर्घटनेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दु:ख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात हिमनग कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल आणि जीवीतहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

देवभूमी उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात हिमनग तुटून झालेल्या प्रचंड हानीचे वृत्त समजल्यावर व्यथित झालो. दुर्घटनेत काही निरपराध लोकांना जीव गमवावा लागला याचे तीव्र दु:ख झाले. या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांच्या सुखरुप सुटकेसाठी मी प्रार्थना करतो. तसेच मृत व्यक्तींच्या नातलगांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.