गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना कराडमध्ये अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी पिस्तूल बाळगणाऱया दोघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. कराड तालुक्यातील सुर्ली येथील बसस्टॉपवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अमोल जगन्नाथ माने (वय 32, रा. वनवास माची, ता. कराड), संभाजी संपत मदने (रा. बनवडी कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सुर्ली येथील बसस्टॉपजवळ एकाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने संशयिताला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे हस्तगत केली. चौकशी केली असता पिस्तूल व काडतुसे दुसऱया एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिले आहे, असे त्याने सांगितले. पिस्तूल ठेवण्यास देणारा गंभीर गुह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर त्यालाही पोलिसांनी सांगली जिह्यातील वांगी येथून अटक केली.