विमान प्रवासाची तारीख वाढवणे पडले महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटीमधील निवृत्त अधिकाऱ्याला विमान प्रवासाच्या नावाखाली 3 लाख 45 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे आयआयटीमधील निवृत्त अधिकारी असून ते पवई येथे राहतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वाराणसीला जाण्यासाठी विमान तिकिटे काढली होती. ते मार्च महिन्यात विमानाने वाराणसीला जाणार होते, पण कोविड 19ची लस सामान्य लोकांना अजून उपलब्ध न झाल्याने त्याच्या मनात प्रवासाबाबत भीती होती. त्याने मार्चऐवजी एप्रिल महिन्यात वाराणसीला जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी टोल फ्री नंबरवर फोन केला. एक अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून संभाषण सुरू केले. बोलण्यात गुंतवून मोबाईलवर आलेला चार आकडी नंबर घेऊन बँक खात्यावर डल्ला मारला.