CNG वर चालणारा ट्रॅक्टर शुक्रवारी लाँच होणार, वर्षाला 1 लाख रुपयांची बचत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये परावर्तन करण्यात यश आले असून सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर शुक्रवारी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लाँचिंग पार पडणार आहे. मूळ डिझेलवर चालणारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचे काम हे रामवत टेक्नो सोल्युशन आणि टॉसमेट्टो अचिल इंडिया यांनी संयुक्तरित्या केले आहे. सीएनजीवर चालणाऱ्या या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सीएनजी हे इंधन स्वस्त असल्याने त्यावर शेतकऱ्यांवा करावा लागणारा खर्च कमी होईल ज्यामुळे आपोआप त्याची बचत होऊन उत्पन्न वाढेल असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  सीएनजीवर ट्रॅक्टर चालवल्याने शेतकऱ्यांचे वर्षाला इंधनावर खर्च होणारे 1 लाख रुपये वाचतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.