अमरावती महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढले; शाळा बंद करण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या क्षेत्रात असलेल्या सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महापौर चेतन गावंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे रुग्ण घटत असल्याने महापालिका क्षेत्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात महापालिकेच्या क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे 5 वी ते 8 वीच्या खाजगी शाळा व महापालिकेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती महापालिकेने शाळांच्या प्राधिकरणाला पाठविली आहे.

मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होत असल्यामुळे त्यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरु झाली आहे. कोरोनाचा वाढता फेलाव रोखण्यासाठी विडचे रुग्ण आटोक्यात येण्यासाठी ही सर्व कारवाई मनपाने सुरु केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.