सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

जळगाव सपकाळ येथील मोनिका गाडेकर या महिलेने सासु सासर्‍याच्या व पतीच्या जाचाला कंटाळून आपल्या जळगाव सपकाळ येथील रहात्या घरात पंख्याला गळफास घेऊन रविवारी दुपारी आपली जिवन यात्रा संपवली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईच्या  फिर्यादीवरून पारध पोलिसात सासु,सासरे व पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जळगाव सपकाळ येथील मोनिका गाडेकर हिचे लग्न 2017 मध्ये शिवाजी गाडेकर सोबत मोठ्या थाटामाटात संप्पन्न झाला होता. सुरुवातीचे काही दिवस ति ला चांगली वागणूक देण्यात आली. मात्र त्यानंतर तीचा पती शिवाजी गाडेकर, सासरा भालचंद्र गाडेकर आणि सासू बेबीबाई गाडेकर यांनी सदर महिलेस तूझ्या माहेरहून लक्झरी बस घेण्यासाठी दहा लाख घेऊन ये म्हणून तगादा लावला आणि तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून रविवारी दुपारी मोनिकाने माहेरी घरात छाताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या संदर्भात मुलीची आई शिला प्रभाकर मोडके रा. नांदुरा, जि. बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशिरा पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपीना पारध पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.