देशात कोरोना पुन्हा सक्रिय, बंगळुरूत एकाच इमारतीमध्ये 103 जणांना लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गर्दी आणि समारंभांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एकाच इमारतीमध्ये 103 पेक्षा जास्त रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

बंगळुरूमधील ‘एसएनएन राज लेकह्यू अपार्टमेंट’ या इमारतीमधील 45 रहिवासी अलीकडेच एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यांच्यामार्फत इमारतीमधील शेकडो रहिवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी, आचारी आणि ड्रायव्हर्सचा त्यात समावेश आहे. इमारतीमध्ये 435 फ्लॅट्स आहेत. त्यात दीड हजार रहिवासी राहतात. गेल्या 6 फेब्रुवारीला झालेल्या या पार्टीत एकूण 500 रहिवासी उपस्थित होते. बहुतांश रहिवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. 10 फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर या इमारतीमध्ये स्थानिक प्रशासनाने चाचणी मोहीम राबवली होती.