जालन्यातील तडेगाववाडी येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तडेगाववाडी येथील तरुण शेतकरी राहुल रायसिंग सुंदरडे (30) हे शेतात मका जमा करीत असताना त्यांच्या अंगावर विज कोसळून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी आज 18 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

जालना जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे सदरील शेतकरी सोंगणी केलेली मका दुपारी जमा करत होता. सुमारे चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्याच वेळी राहुल सुंदरडे यांच्या अंगावर वीज पडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले व रात्री उशिरा त्यांच्या गावी तडेगाव वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.