
कविवर्य वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी ग्रंथालय संचालनालयच्या वतीने ‘प्रबोधन’ पाक्षिकाचे शताब्दी वर्ष’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये ‘प्रबोधन’ पाक्षिकाचे प्रदर्शन, प्रबोधनकारांनी लिहिलेल्या ग्रंथांचे तसेच त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथांचे, दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आणि मराठी भाषेतील निवडक दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
‘प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष’ व ‘मराठी भाषा गौरव दिन’ चे उद्घाटन उद्या सकाळी 11.30 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, प्रमुख वत्ते ‘प्रबोधन’ पाक्षिक विषयावरील संशोधक डॉ. अनंत गुरव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्रधान सचिव ओ. पी .गुप्ता उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://www.youtube.com/DOLMaharashtra लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे.


























































