
बिहारमधील नवादा जिल्ह्यात एका हत्तीने धुडगुस घातला आहे. हत्तीने आतापर्यंत चार जणांचा जीव घेतला असून त्यात 10 वर्षीय बालकाचाही समावेश आहे.
या हत्तीने बुधवारी आणि गुरूवारी चार जणांचा जीव घेतला आहे. हत्तीची इतकी दहशत आहे की लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. सध्या वन विभागाच्या तीन टीम हा हत्ती पकडण्याच्या कामाला लागले आहेत. हा हत्ती झारखंडच्या जंगली भागातून बिहारच्या नवादा जिल्ह्यात आला. या हत्तीला रहिवासी भागातून हुसकावण्यासाठी फटाके फोडले जात आहेत. वेळ पडल्यास हत्तीला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याची तयारीही वन विभागाने केली आहे.
बिहारमध्ये बभनौली गावात विनोध चौहान आणि आनंद सिंह हे राहत होते. विनोद आणि सिंह रात्री शेतात जात होते तेव्हा हत्तीने त्यांना उचलून आपटले आणि पायाखली चिरडले. दोघांचा जागीच मृत्यू झला. बालेश्वर यादव यांनाही हत्तीने चिरडून ठार केले. त्यामुळे गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण होते. इतकेच नाही तर सीतामढी येथे राहणार्या इंदर मलिक या 10 वर्षीय बालकाचाही हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.


























































