
निष्काळजीपणामुळे आपल्याकडून झालेल्या चुकांचा भुर्दंड दुसऱ्याला नाहक सहन करावा लागतो. अशाच काही चुकांमुळे सात लहान बालकांचा मृत्यू झाला आहे.
बिकानेर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत 7 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना निष्काळजीपणामुळे झालेल्या चुकांमुळे झाल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नोखा येथील आरकेपुरम कॉलनीत राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. येथील एका कुंडाचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यावर त्या कुंडाचे झाकण लावायला कामगार विसरले. त्यामुळे झाकण उघडे राहिले. त्यामुळे या दोन भावांचा त्या कुंडात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेबाबत मानसोपचार तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, हे विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तीमुळे किंवा कोणाचा तरी बदला घ्यायच्या हेतूने हा अपघात झालेला नाही, तर त्या कुंडाचे काम करणाऱ्या कामगारांच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणामुळे त्या कुंडाचे झाकण उघडे राहिले. त्यामुळे ही दोन लहान मुलं त्या कुंडात पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. काही वेळा आपण केलेल्या चुकांमुळे काहीतरी अघटीत घडू शकतं हे पालकांच्या लक्षात येत नाही. यामुळेच अशा प्रकारच्या घडतात.
अशीच एका घटना बीकानेर येथील पुनरासर येथे घडली आहे. रस्त्यावरून चालणारा एक अडीच वर्षाचा मुलगा गाडीखाली आला. पोलीस हा मुलगा रस्त्यावरच कसा आला आणि त्याला चालकाच्या गाडीचा धक्का कसा बसला ? याचा शोध घेत आहेत. या मुलाला उपचाराकरिता ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अशाच प्रकारची निष्काळजीपणामुळे लहान मुलीचा जीव गेल्याची घटना पाचू येथील सिलवा येथे घडली आहे. या गावातील एका 14 महिन्याच्या मुलीचा जळल्याने मृत्यू झाला. तसेच लूणकरनसरमधील सुरनाणा येथेही एका मुलीचा जळल्याने मृत्यू झाला आहे.
या सर्व घटना त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.


























































