
सर्वसामान्य कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱया शिवसेनेला कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार बोरिवली-दहिसरमधील 500 माथाडी कामगारांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना उपनेते, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी त्यांच्या हातावर शिवबंधनक बांधून शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेना सर्वधर्मीयांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून कधीही जातीपातीचे राजकारण करत नाही. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या या मार्गावरूनच शिवसेना पुढे जात आहे. त्यामुळेच कामगारांचा शिवसेनेला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे विनोद घोसाळकर यांनी सांगितले. तसेच कामगारांवर जिथे अन्याय होईल तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण विनोद घोसाळकर यांची नुकतीच भेट घेतली होती. त्याची दखल घेत कामगारांना तत्काळ न्याय मिळवून दिला असल्याचे कामगार नेते इकबाल पटेल यांनी सांगितले. शिवसेना उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक कर्णा अमीन, माजी नगरसेवक व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, परवेझ शेख, नौशाद शेख, अहमद शेख, सलमान उस्मानी, सलीम शेख यांच्यासह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते.






























































