अभिनेत्री हुमा कुरेशी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने बॉलीवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. मात्र आता हुमा सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत चाहत्यांसमोर आली आहे. ‘झी झेस्ट’ वाहिनीवर ‘फिट फॅब फिस्ट विथ हुमा पुरेशी’ हा नवीन शो सुरू झाला आहे. या शोमधून सेलिब्रिटींची जीवनशैली, फिटनेस, फॅशन यावर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळींनाही भेटण्याची संधी मिळणार आहे. शोमध्ये डिझायनर पायल सिंघल, स्टायलिस्ट पर्णिया कुरेशी, मोहित राय, फिटनेस तज्ञ नम्रता पुरोहित, यास्मिन कराचीवाला आणि शिवोहम आदींचा सहभाग असेल.