‘एएससीआय’ने अभिप्रायासाठी मुदत वाढवली !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅडक्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात एएससीआयने शुक्रवारी डिजीटल मीडियावर इन्फ्लुएन्झर ऍडक्हर्टायझिंगसाठी ड्राफ्ट गाईडलाइन्सवरील फीडबॅककरिता मुदत 21 मार्चपर्यंत वाढवली. पूर्वी ग्राहक, विविध भागधारक आदींसाठी अंतिम मुदत 8 मार्च होती. विविध भागधारकांनी केलेल्या विनंतीमुळे मुदतवाढ करण्यात आली आहे. एएससीआयला मार्गदर्शक तत्वांसाठी मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याचा आनंद झाला आहे. अभिप्रायांचा विचार केल्यानंतर अंतिम मार्गदर्शकतत्वे 15 एप्रिल रोजी जारी करण्यात येतील आणि 1 मेपासून लागू होतील.