
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे मुंबई, पुण्यातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संकटातही व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय ऑनलाईन सुरु करता यावा आणि वाढवता यावा यासाठी ‘दुकान’ या प्लॅटफॉर्मने मदतीचा हात दिला आहे. ‘दुकान’मुळे तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसलेले व्यापारी देखील स्मार्ट फोनवर तीस सेकंदांपेक्षा कमी वेळात ऑनलाईन स्टोअर तयार करू शकतात आणि आपल्या ग्राहकांना खरेदीचा अधिक चांगला अनुभव मिळवून देऊ शकतात.





























































