
राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रविवारी तिसऱया दिवशी हिंदुस्थानने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पुरुष व महिला गटात सुवर्णपदकांची कमाई केली. सौरभ तिवारी, अभिषेक वर्मा व शाहजार रिज्वी या त्रिकुटाने पुरुष गटात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात महिला गटात यशस्विनी देस्वाल, मनू भाकेर व श्रीनिवेथा परमानंथ या त्रिकुटाने सुवर्णपदकावर मोहर उमटवली.
तीन नेमबाजांना कोरोना
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन नेमबाजांना कोरोनाची लागण झाली आहे. या नेमबाजांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या तिघांसोबत एकाच खोलीत राहणाऱया त्यांच्या सहकाऱयांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या तिघांमध्ये दोन हिंदुस्थानी नेमबाजांचा समावेश असल्याचे समजते.




























































