काही शहरांत लॉकडाऊन करावा लागेल! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या रुग्णसंख्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर काही शहरांत लॉकडाऊन लावावा लागेल. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. पण जनतेला एकच आवाहन करतो की, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थिती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल बोलणे झाले आहे. काही शहरांत लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल.

हाफकिनमध्ये 17 लाख डोस तयार करणार

हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परकानगी मिळाकी. आम्ही तिथे 17 लाख डोस तयार करू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण काढीची टक्केकारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के आहे. कोकिशील्डच्या 2 डोसमध्ये 45 ते 60 दिकसांचे अंतर ठेकण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तीन महिन्यांत लसीकरण पूर्ण करणार

दररोज राज्यात 3 लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंतदेखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोक लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे, तीन महिन्यांत लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे, असे राजेश टोपे म्हणाले.