
पती-पत्नीच्या नाजूक नात्याला कलंक लावणारी घटना ओडिसा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ओडिसामधील कंधमाल जिल्ह्यातील तुमुदीबांध येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचे 10 वर्षांपूर्वी केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडाई गावातील चंदन आचार्य या व्यक्तिसोबत लग्न झाले होते. चंदन रिक्षाचालक आहे. तो, त्याची पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत चंद्रशेखर पोलीस परिसरातील पद्मावती विहार या इमारतीमधील एका खोलीत भाड्याने राहात होते.
सुखी संसार सुरू असतानाच लग्नानंतर तीन वर्षांनी चंदन आचार्यने पैशाकरीता पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. दररोज नवीन व्यक्तिला सोबत घेऊन तो घरी येत असे. त्याच्या सोबत आलेल्या अनोळखी व्यक्तिचे मनोरंजन करण्यासाठी तो पत्नीला त्रास द्यायचा. पत्नीने हे घृणास्पद कृत्य करण्यास नकार दिला तर तो तिला मारहाण करत असे. गेल्या सात वर्षांपासून पती चंदन आचार्य पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. घरातूनच तो सेक्स रॅकेट चालवायचा. या सेक्स रॅकेटसोबत काम करायला पत्नीने विरोध केला. त्यामुळे त्याने तिला गंभीररित्या मारहाण करून जखमी केले होते.
या प्रकरणाबाबत पीडित पत्नीने पती चंदन आचार्य विरोधात पाच दिवसांपूर्वी चंद्रशेखरपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. एक दिवस दारूच्या नशेत पती चंदन आचार्य घरी आला तेव्हा पुन्हा त्याला पत्नीने व्यवसायाबाबत विरोध केला तेव्हा दोघांमध्ये खूप भांडण झाले. शाब्दिक मतभेदानंतर आरोपी चंदन आचार्यने पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पत्नीच्या गुप्तांगामध्ये दारूची बाटली घातली त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर काही वेळाने शुद्धीवर आल्यावर पीडित महिलेने तिच्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली, अशी माहिती चंद्रशेखरपूर पोलिसांनी दिली आहे.
तेव्हा पीडित महिलेच्या आईनेसुद्धा जावयाविरोधात पोलिसात तक्रार केली त्यानंतर चंद्रशेखरपूर पोलीस पथकाने पीडित आणि तिच्या 5 वर्षीय मुलीला एका बंद खोलीत रेस्क्यू केले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी चंदन आचार्यला अटक केली असून त्याच्यावर कलम 323, 498 (A) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































