घरी बसल्या फक्त 10 मिनिटांत असं काढा ‘पॅनकार्ड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण अद्याप पॅनकार्ड काढलं नसले, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पॅनकार्ड हे आर्थिक किंवा बँकिंग संबंधित कामांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. चालू आर्थिक वर्षात अनेक ठिकाणी पॅनकार्डची आवश्यकता लागू शकते. यासाठीच पॅनकार्ड काढणं खूप महत्वाचं आहे. जर आपण अद्यापही पॅनकार्ड काढलं नसेल, तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला फक्त 10 मिनिटात पॅनकार्ड कसं काढावं याबाबत माहिती सांगणार आहोत.

पॅनकार्ड काढण्यासाठी असा करा अर्ज

  • प्रथम प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जावे. यानंतर डावीकडील “Status/Download PAN” या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला “Get New PAN” आणि “Check Status/Download PAN” हे दोन पर्याय दिसणार. यामधील “Get New PAN” वर क्लिक करा.
  • यानंतर आपला आधार नंबर प्रविष्ट करा आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. हे केल्यानंतर तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी कोड येईल. ओटीपी प्रविष्ट केल्यानांत ईमेल आयडी टाकावे आणि पॅनकार्डसाठी आवश्यक असलेली माहिती भरा.
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आपला पॅन नंबर अवघ्या 10 मिनिटांत मिळेल, जो तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकाल. अर्ज केल्यानंतर आपण या संकेतस्थळावरील “Check Status/Download PAN” पर्यायावर क्लिक करून पॅन कार्ड पीडीएफमध्ये डाउनलोड करू शकाल. जर तुम्हाला हार्ड कॉपी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.