
आरटीईच्या 25 टक्के आरक्षित कोटय़ांतर्गत राज्यभरातील खासगी शाळेत राखीव असलेल्या नर्सरी आणि पहिलीच्या एकूण 96 हजार 684 जागांसाठी तब्बल 2 लाख 23 हजार 61 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 मार्चला संपली. सध्या प्रवेश अर्जाची छाननी सुरू असून लवकरात लवकर सोडतीची घोषणा करण्यात येणार आहे.
गरीब विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक अर्ज पुणे जिह्यातून आले आहेत. पुणे येथील 14 हजार 773 जागांसाठी आतापर्यंत 55 हजार 833 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्या खालोखाल नागपूर जिह्यातून अर्ज आले आहेत. जिह्यातील 5729 जागांसाठी 24 हजार 168 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ठाणे जिह्यातूनही अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून जिह्यातील 12 हजार 74 जागांसाठी 19 हजार 54 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
इतर जिह्यांतून आलेले
- अर्ज संभाजीनगर जागा – 3,625, प्रवेश अर्ज 11,905
- नाशिक जागा – 4,544, प्रवेश अर्ज 13,327
- रायगड जागा – 4,236, प्रवेश अर्ज 8,०१३
यंदा प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी एकच सोडत काढण्यात येणार आहे. तसेच सोडतीनंतर शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी काढली जाणार आहे. प्रतीक्षा यादी संपल्यानंतरही शाळेमध्ये जागा रिक्त राहिल्यास तसेच अर्ज शिल्लक असल्यास पुढे सोडत सुरू ठेवून विद्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाणार आहे.
मुंबईतून 13 हजार 37 अर्ज
आरटीई प्रवेशासाठी मुंबईत 5 हजार 227 जागा असून यासाठी 13 हजार 37 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत. सध्या या अर्जांची छाननी सुरू असल्याचे मुंबई महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी सांगितले. बऱयाच विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतरच सोडत कधीपर्यंत जाहीर होणार हे स्पष्ट होईल.



























































