तीन आठवडे धोक्याचे, केंद्रीय उच्चस्तरीय समितीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागली आहे. पुढचे तीन आठवडे धोक्याचे असून प्रत्येकालाच अत्यंत सावध राहावे लागेल, असा इशारा केंद्रीय उच्चस्तरीय समितीने दिला आहे. देशातील कोरोना स्थितीबाबत केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते.