
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या, व्यवसाय बुडाले. मात्र काहींनी या संकटातही संधी शोधली. कोच्ची येथे राहणारा हाफिज रहेमान आणि त्रिवेंद्रमचा अक्षय रविंद्रन या दोघा मित्रांची गोष्ट अशीच काहीशी प्रेरणादायी आहे. या एमबीए पदवीधारकांनी स्वतःची नोकरी सोडून घरगुती लोणचं बनवून विकण्याचा स्टार्टअप सुरू केला. यातून दोघेही आजा लाखो रुपये कमवत असून 40 महिलांना रोजगार देत आहेत.
हाफीज रहेमान हा एका मल्टिनॅशनल कंपनीत एचआर होता तर अक्षय स्पोर्ट्स ब्रॅण्डचे मार्पेटिंगचे काम करत होता. गरजू महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून त्यांनी घरगुती लोणचं बनवण्याचे सोशल व्हेंचर सुरू केले. गेल्या वर्षी त्यांनी ‘अथेय नल्लाथा’ नावाची कंपनी सुरू केली.
लोणचं तयार करून विकण्याचा निर्धार झाल्यानंतर बिझनेस मॉडेल काय असेल, उत्पादनाची गुणवत्ता, किंमत किती असेल याशिवाय मार्पेटचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आपल्या ब्रॅण्डची चव वेगळी कशी राहील यावर लक्ष दिले.
कोळंबी, खजुराचे लोणचं
सध्या त्यांनी विविध फळं आणि भाज्यांचा वापर करून लोणचं बनवले आहे. याशिवाय एक लोणचं द्राक्षे, आणि आंबा वापरून तर दुसरे लिंबू आणि खजुरापासून तयार केले आहे. कोळंबी आणि पपई, मासे आणि आंबे वापरूनही ते खास लोणचं तयार करतात. लोणच्याची क्वालिटी टेस्टिंग आणि प्रोसेसिंग झाल्यावर ऑनलाइन विक्रीवर लक्ष दिले, सोशल मीडियावर प्रसिद्धी केली. काही दिवसांनी स्वतःची वेबसाईट सुरू केली.























































