दीड वर्षे काहीच कमावलं नाही! ‘दिल चाहता है’ मधील अभिनेता आर्थिक संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. मनोरंजन जगताला याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील शूटिंग थांबले आहे. अनेक मालिका, चित्रपट लटकले आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हिंदी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते अयुब खान हेदेखील आर्थिक विवंचनेत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की, गेल्या दीड वर्षापासून काहीच कमावलं नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तरी मदत मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

अयुब खान म्हणाले, कोरोनामुळे प्रत्येकाच्या कामावर परिणाम झाला आहे. प्रत्येक जण संघर्ष करत आहे. दीड वर्ष झाले असेल माझ्याकडे नियमित काम नाही. या दिवसांत मी काहीच पैसा कमावला नाही. माझा बँक बॅलन्स संपत चाललाय. माझ्यासाठी ही मोठी समस्या आहे. असंच सुरू राहिलं तर मदत मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. अयुब खान यांनी ‘उतरन’, ‘शक्ती’, ‘अस्तित्व के एहसास की’, ‘रंजू की बेटियॉ’ अशा टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी ‘दिल चाहता है’, ‘एलओसी’ आणि ‘मेला’ सारख्या सिनेमांतही काम केले आहे.