आता पोस्टाच्या एटीएममधून दररोज 25 हजार रुपये काढा, पाच मोफत व्यवहारांनंतर 23 रुपयांपर्यंत शुल्क आकारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टपाल विभाग आपल्या बचत खातेधारकांना एटीएम, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगची सुविधा देते. पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड असल्यास, त्याचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. आता तुम्ही एटीएममधून एका दिवसात जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढू शकता, मात्र एका वेळी कमाल 10 हजार रुपयेच काढता येतील. तसेच, पैसे काढताना खात्यात किमान 500 रुपयांची शिल्लक असणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा व्यवहार नाकारला जाऊ शकतो आणि 23 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्कही आकारले जाऊ शकते.

मोफत व्यवहाराची मर्यादा

पोस्ट खातेदारांना दर महिन्याला 5 मोफत व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही मिळून) मिळतात. पोस्ट ऑफिसच्या एटीएमवर मोफत मर्यादा संपल्यानंतर आर्थिक व्यवहारांसाठी 10 रुपये अधिक जीएसटी आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपये अधिक जीएसटी शुल्क द्यावे लागेल.

पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा रकमेवर वार्षिक 4 टक्के दराने व्याज मिळते.

देखभाल शुल्क ः एखाद्या आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यातील किमान शिल्लक 500 रुपयांपेक्षा कमी आढळल्यास, बँक तुमच्याकडून 50 रुपये अकाऊंट मेंटेनन्स शुल्क आकारू शकते.