
सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे भीतीदायक किंवा मजेशीर फोटो शेअर होत असतात. हे फोटो बघून कधी पोटात भीतीचा गोळा येतो, तर कधी हसू आवरत नाही.
अजगराचा असाच एक गमतीदार फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत अजगर खुर्चीवर ऐसपैस बसलेला दिसतोय. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. त्याला कॅप्शन देत म्हटलंय, बघा कोणत्या मिटिंगचे अध्यक्षपद भूषवतोय. सुशांत नंदा यांनी शेअर केलेला फोटो नेटिझन्सला आवडला आहे.
त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया या पोस्टला दिलेल्या आहेत. खरंच ऐटीत बसलेला अजगर एखाद्या मिटिंगसाठी मधोमध बसलेला आहे, असंच फोटो बघून वाटत आहे.


























































