उडन खटोला, 60 वर्षांच्या दयाराम यांनी घेतली झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्न पूर्णत्वास नेता येते. राजस्थानच्या अलवर शहराजवळील माधोगढ गावात राहणाऱया दयाराम गुर्जर यांनी हेच दाखवून दिलंय. दयाराम यांनी उडन खटोला (फ्लाईंग मशीन) बनवला आहे. त्यासाठी स्वतŠजवळची आयुष्यभराची कमाई खर्च केली आहे. त्यांनी गुरुवारी एका मैदानात उडन खटोल्याची चाचणी घेतली. खटोला पाच मिनिटं 300 मीटरपर्यंत उडाला. यावेळी सिरसा येथील पॅराग्लायडिंग वैमानिक कुलदीप टांक उपस्थित होते. गावकऱयांनी जोरदार टाळ्या वाजवून दयाराम यांना प्रोत्साहित केले. सध्या स्थानिक प्रशासनाने त्यांना उड्डाण घेण्यास बंदी घातली आहे.

दयाराम जेमतेम पाचवी शिकलेले आहेत. ते इंजिन दुरुस्तीचे तसेच दूध-मावा विकण्याचे काम करतात. 1981 साली त्यांनी पहिल्यांदा जयपूर-दिल्ली विमान प्रवास केला होता. त्यावेळी स्वतःचे विमान असावे असं त्यांना वाटू लागले. त्यांनी उडन खटोला तयार करण्याचे ठरवले. गेले वर्षभर त्यांनी तयारी केली. आता त्याची चाचणीही केली.

दयाराम यांनी बंगळुरू येथून 8.50 लाख रुपये खर्चून त्यांनी रोटेक्स कंपनीचे पॉवर एअर क्राफ्ट इंजिन मागवले होते. याशिवाय पॅराशूट आणि अन्य साहित्य आणले. यासाठी साधारण 15 लाख रुपयांचा खर्च आला. कमी शिक्षणामुळे उडन खटोला बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, असे दयाराम सांगतात.