
कोरोनाबाधित रुग्णाला उपचारांसाठी शिरवळवरून साताऱयाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना खंबाटकी घाटात घडली आहे. यात रुग्णासह दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.
शिरवळ येथून सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोरोना रुग्ण घेऊन रुग्णवाहिका साताऱयाला निघाली होती. खंबाटकी घाटात आली असता, चालकाचा ताबा सुटून रुग्णवाहिका उलटली. दरम्यान, पाठीमागून येणाऱया प्रांताधिकारी संगीता राजे-चौगुले यांनी हा अपघात पाहिल्यानंतर तत्काळ गाडी थांबवून रुग्णवाहिकेतील रुग्णाला पुढील उपचारांसाठी सातारा येथे पाठविण्याची व्यवस्था केली.



























































