
देशभरासह मुंबईत तिसऱया टप्प्यात सुरू होत असलेल्या लसीकरणासाठी पालिकेने सुयोग्य नियोजन केले असून केंद्रांवर गर्दी तसेच गैरसोय होऊ नये म्हणून 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना खासगी केंद्रांवर लस दिली जाणार आहे तर पालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या केंद्रांत 45 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. या तिसऱया टप्प्यात सर्वांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवार, 1 मे 2021 पासून सुरू होणार आहे. मात्र मुंबईची लोकसंख्या पाहता या मोहिमेचे सुयोग्य असे नियोजन करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर 73 खासगी केंद्रांवरच 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. त्यात आणखी 26 खासगी रुग्णालयांकडून लसीकरण केंद्रांसाठी अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील केंद्रांची संख्या वाढून 99 होणार आहे.
मुंबईत पालिका आणि राज्य सरकारच्या एकूण 63 केंद्रांवर 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिले. तिसऱया टप्प्यातील पूर्वतयारीसंदर्भात आयुक्त चहल यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेत हा निर्णय जाहीर केला.
पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण!
देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मात्र पालिकेला सद्यस्थितीत पात्र लाभार्थ्यांनाच द्यायला लसींचे पुरेसे डोस मिळत नाहीत. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात डोस मिळाले तरच 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देता येईल अशी भूमिका पालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे खासगी रुग्णालयांबरोबर ‘टायअप’
मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध पंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करून आपल्या 18 ते 45 वयोगटातील सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिपेने केले आहे.
लसीसाठी उत्पादकांकडे पाठपुरावा
मुंबईत 18 ते 45 या वयोगटात अंदाजे 90 लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी 2 डोस याप्रमाणे सुमारे 1 कोटी 80 लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता लस साठय़ाची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. त्यासंदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक पंपन्यांकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.































































