
भाजपचे कोपरगावचे माजी शहराध्यक्ष आणि दिवंगत माजी खासदार सूर्यभान पाटील-वहाडणे यांचे कट्टर समर्थक प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे (वय 75) यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही.
प्रा. शिंदे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे, यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली नाही. त्यांची सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


























































