घरफोडीतील चोरट्याला अटक; 1 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडील 1लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शितल गोरख काळे (वय 35, रा. हजारमाची,ता.कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

24 एप्रिल रोजी रेणुकानगर सैदापूर (ता.कराड) येथे एका घरात पाठीमागील दरवाजातून प्रवेश करून 70 वर्षांची वृद्धा झोपली असताना त्यांच्या गळ्यातील गठण व मणीमंगळसूत्र चोरट्याने चोरले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखाने सुरू केला होता. पोलिसांनी तपास करत त्याला अटक केली आहे.

27 एप्रिल रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार संजय जाधव यांना माहिती मिळाली की, चोरी प्रकरणातील आरोपी ओगलवाडी येथे चोरलेले सोने विकण्यासाठी येणार आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस अंमलदार संजय जाधव, तानाजी शिंदे, मारुती लाटणे, विनोद माने यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता 1 लाख 15 हजार किंमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत.