
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 14 एप्रिलला जिह्यात रोज सातशेच्या आसपास असणारी रुग्णसंख्या आज 1400च्या आसपास आहे. पूर्वी 4769 ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तिप्पट म्हणजे बारा हजारांच्या घरात गेली आहे. हे चित्र सांगली जिह्यासाठी चिंताजनक आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 14 एप्रिलपासून संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर ‘बेक्र द चेन’अंतर्गत कडक नियम लागू केले. यातून औषध आणि जीवनावश्यक बाबींना वगळण्यात आले. भाजीपाला, किराणा माल, फळे अशा जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आली. इतर वेळेला सर्व दुकाने बंद ङ्खsवण्याचे आदेश दिले. त्यामुळे रस्त्यावरची वर्दळही कमी झाली. या लॉकडाऊनची अंमलबजावणी सांगली जिह्यात चांगल्या पद्धतीने होत आहे. तरीही या काळात रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. सध्या सांगली जिह्याचा मृत्यूदर 3 टक्के आहे. इतर जिह्यांच्या तुलनेत हा दरही जास्त आहे. जिह्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे.
महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा होणार
z राज्य शासनाच्या 28 एप्रिलच्या निर्देशानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार सांगली जिह्यात राज्य स्थापनेचा वर्धापनदिन 1 मे रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 8 वाजता जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ होणार आहे.
15 एप्रिलपासून रुग्णांची आकडेवारी
दिनांक रुग्ण मृत्यू
15 एप्रिल 921 17
16 एप्रिल 883 15
17 एप्रिल 962 14
18 एप्रिल 830 14
19 एप्रिल 992 18
20 एप्रिल 1090 19
21 एप्रिल 1116 22
22 एप्रिल 1264 19
23 एप्रिल 1309 28
24 एप्रिल 1175 32
25 एप्रिल 1150 33
26 एप्रिल 1141 40
27 एप्रिल 1395 24
28 एप्रिल 1363 39































































