वादळी पावसाने कोल्हापूरकरांना झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादळी वाऱयासह आलेल्या वळवाच्या पावसाने आज सायंकाळी कोल्हापूर जिह्याला तासभर झोडपून काढले. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून जिह्यात प्रचंड उष्मा वाढला आहे. दोन-तीन दिवसांपासून ठिकठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवडय़ात कागल तालुक्यातील काही गाकांत बर्फकृष्टीप्रमाणे गारांचा वर्षाक होऊन सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसून आले होते. तर, दोन दिवसांपूर्की कोल्हापूर शहराच्या बहुतांश भागात गारांचा पाऊस झाला होता. आज दिवसभर हवेत कमालीचा उष्मा जाणवत असतानाच, दुपारी तीननंतर आभाळ काळकंडू लागले होते. साडेचारच्या सुमारास वादळी काऱयासह ढगांच्या गडगडाटात कळीक पाकसाने सर्कत्र हजेरी लाकली. सुमारे तासभर झालेल्या पाकसाने हकेत गारका निर्माण झाला होता. तर, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. रंकाळा रोडवर झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अग्निशमन विभागाकडून हे झाड हटविण्याचे प्रयत्न सुरू होते.

महाबळेश्वरातही तुफान पाऊस

महाबळेश्वर ः शहर व परिसरात मंगळवारी दुपारी धडकी भरवणाऱया विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस बरसला. गेली दोन दिवस महाबळेश्वर व शहरास दुपारी पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. सकाळी उष्मा तर दुपारी कोसळणाऱया पावसानंतर गारवा असे वातावरण शहरवासीयांना अनुभवायास मिळत आहे.

नगरमध्ये अवकाळी पावसाची धास्ती

n नगर जिह्यात यंदा दीड हेक्टरच्या जवळपास कांद्याची रब्बीत लागवड झाली आहे. त्याची आता बहुतांश भागात काढणी सुरू आहे. कोरोनाची बाधा वाढत असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांचे बाजार समित्यांतील लिलाव बंद आहेत. कांदा लिलावही बंद आहेत. त्यामुळे आधीच दर पडलेले असताना आता तीन-चार दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. नेवासा, नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेरच्या काही भागांत वादळी वाऱयासह पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. त्यामुळे अनेक संकटांवर मात करत हाती आलेल्या कांद्यासह अन्य पिकांचे तसेच फळे, भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱयांना आहे.