पाऊस वेळेवर पडावा म्हणून त्रिपुरात बेडकांचे लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात लग्नसमारंभांकर खूप निर्बंध आलेत. त्यामुळे या काळात अनोखे लग्नसोहळे पार पडताना दिसत आहेत. कुठे ऑनलाईन विवाह होतोय तर कुठे पीपीई कीट वापरून लगीनगाठ बांधली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्रिपुरा येथे एक केगळाच छोटेखानी विवाह सोहळा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे हे माणसांचे लग्न नव्हेते तर बेडकांचे होते. पाऊस चांगला पडावा म्हणून पारंपरिक रीतीरिवाजानुसार बेडकांचे लग्न लावण्यात आले. हा व्हिडियो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काही प्रांतांमध्ये पाऊस वेळेवर पडावा यासाठी बेडकांचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्रिपुरा येथील व्हिडियोत दोन महिलांनी हातात एक-एक बेडूक पकडले आहे. विवाहापूर्वी या बेडकांचे सर्क पारंपरिक विधी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. बेडकांना तलाकाच्या काठी स्नान घालून नवीन कपडे घालण्यात आले. हार घालण्यात आले. हा व्हिडियो बघून अनेक जण दोन्ही बाजूने प्रतिक्रिया देत आहेत. कुणी पूर्कापार चालत आलेल्या प्रथापरंपरेची माहिती देतंय, तर कुणी अंधश्रद्धा म्हणून टीका करत आहे.