नायट्राझेपॅम आयपी या अमली पदार्थाच्या गोळ्यांसह तिघांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नायट्राझेपॅम आयपी या अमली पदार्थाच्या गोळ्यांचे 59 बॉक्स घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आलेल्या तिघांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

तीन इसम बेकायदेशीरपणे नायट्राझेपॅम आयपी या अमली पदार्थाच्या गोळ्यांचा साठा घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून नौशाद खान, शाहिद खान या दोघांवर ताब्यात घेतले. त्या दोघांकडे नायट्राझेपॅम आयपी या अमली पदार्थाच्या गोळ्यांचे तब्बल 59 बॉक्स सापडले. अफजल कुरेशी याच्याकडून त्याने या गोळ्या घेऊन त्या विकायच्या तयारीत असल्याचे चौकशीतून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अफजलला देखील अटक केली.