मनतरंग – कम्फर्ट झोन ओलांडताना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

कृती क किचारधारा आपल्याला सुरक्षित काटते. त्याची हळूहळू सकय होते आणि ती कृती किंका किचार आपल्याला सुरक्षित काटतो. या स्थितीला घट्ट पकडून बसण्याची मनोधारणा आपल्या सगळ्यांच्यात कमी-अधिक प्रमाणात असते. हा असतो आपण निकडलेला कम्फर्ट झोन. परंतु आयुष्यात पुढे जायचं तर यातून बाहेर पडण्याची केळ येतेच.

आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्याबद्दल बऱयाच कल्पना असतात. Larger than life जगावं किंवा साधं जगावं… आपण स्वतः कसं असावं, काय काय करावं, पुढे कसं जावं, कशा प्रकारे पावलं टाकावीत या आणि अशासारख्या असंख्य कल्पनांमध्ये आपण अगदी शाळेत असल्यापासून रमलेलो असतो. आपल्या केलेल्या कल्पना, पाहिलेली स्वप्नंसुद्धा छान छान शब्दांत गुंफलेली असतात. ताजीतवानी असतात. म्हणून की काय आपल्याला त्यात रमायलाही आवडतं. शाळेत असताना मग कधीतरी परीक्षेत आलेल्या 10 मार्कांच्या निबंधात ‘माझे स्वप्न’ म्हणून स्वतःचं मोठ्ठं घर तरी घेतो किंवा मग गरीबांची सेवा तरी करतो. स्वतःचा व्यवसाय तरी करतो किंवा ऑफिसमध्ये मोठय़ा पोस्टवर तरी असतो. हे इथपर्यंत सर्व ठीक होत जाते.

मग हळूहळू आपण मोठे होऊ लागतो. आपल्याला सगळ्याचं भान यायला लागतं. जसं भान येतं तशा स्वप्नातल्या घराच्या खोल्या कमी होत जातात. नाना प्रकारचे प्रश्न, शंका डोक्यात एकापाठोपाठ यायला सुरुवात होते. कारण त्या वेळी कुठेतरी आपल्या अवाक्याची जाणीव व्हायला सुरुवात होत असते.

मजा अशी आहे की, ही अवाक्याची जाणीव आपल्याला झर्रकन जमिनीवर उतरवते. आपणही मग जरा जपूनच स्वप्न बघायला लागतो. ‘‘मला हे शक्य आहे का? मला जमेल का? छे छे! नकोच तेवढी लांब उडी…’’ अशी स्वतःची समजूत काढून स्वतःच स्वतःला मागे खेचायला सुरुवात करतो. एकदा का ही स्वतःच स्वतःला मागे खेचायची सवय लागली की मग ती आपल्या अंगवळणी पडते. त्यातूनच मग ‘स्वतःला कमी लेखणं’ (Underestimating self) या दुसऱया सवयीचा जन्म होतो. ही सवय मग शेवटी असा काही मनाचा ताबा घेते की आपले मन हे फक्त ‘नाही जमू शकणार’ या एका वाक्यावर ठाम विश्वास ठेवायला लागतं आणि हळूहळू स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास कमी करायला भाग पाडतं.

हे कसं सुरू होतं? कारण कुठलीही नवीन गोष्ट किंवा स्वप्न आपण ‘होईल का?’ या शंकेने तेव्हा बघत असतो. ‘नाही जमणार’ हे म्हणणं ‘जमवतोच’ म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी सोप्पं होत जातं. बऱयाच वेळा ते आपल्या सोयीचंही असतं. सोयीनुसार कारणं जेव्हा दिली जातात तेव्हा आपण आपला ‘कम्फर्ट झोन’ तयार करत असतो. बाहेरची, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी कठीण आहे किंवा पूरक कशी नाही म्हणून मी मागे आहे इत्यादी कारणं मग तयार होत जातात, मनातल्या मनात!

सध्याच्या परिस्थितीबाबत आपलं नेमकं हेच होतं आहे. परिस्थितीला फक्त नावं ठेवत आपण कुठेतरी स्वतःला मागे खेचतो आहोत. स्वतःचा कम्फर्ट झोन आपण तयार केलाय ज्यामध्ये फक्त ‘‘मला आता प्राप्त परिस्थितीत काहीही जास्त करता येणार नाही. परिस्थिती पहिल्यासारखी झाली की मग नक्कीच सर्व काही जमवेन,’’ अशी मनाची समजूत घालून ठेवली आहे.

सध्याची परिस्थिती नक्कीच वेगळी आहे; पण म्हणून ती काही आपल्या प्रगतीच्या आड येणारी किंवा पुढे जाण्यात अडथळा आणणारी तर नक्कीच नाही. ती आता काही काळापूर्वीच आलेली आहे हे आपण कुठेतरी विसरलो आहोत. पूर्वी ही वेळ येण्याआधी आपण आपल्या स्वप्नं किंवा ध्येयांसाठी प्रयत्न केले होते का? या सगळ्याचं आत्मपरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे.

आताची परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहेच. वेगळीही आहे. आपल्यात असणाऱया सकारात्मक विचारांना आणि आपल्या स्वतःवरच्या विश्वासाला तिने व्यवस्थित चॅलेंज दिलेलं आहे. ती तिचा डाव खेळलीय. आता आपल्यावर राज्य आलंय. ते कसं खेळायचं हे आपणच ठरवायचंय. जर जिंकायचं असेल तर काही बदल स्वतःमध्ये करून घ्यावे लागतील.

पहिली गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं. याचाच अर्थ ‘स्वतःच्या निर्णयांची आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं.’ ‘नाही होत किंवा नाही जमत’ याची कारणं न देता ‘कसं नाही जमत? मी वेगळ्या पद्धतीने करून पाहीन’ हे स्वतःला सांगणं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. यात चढउतार येणारच येणार. हे चढउतार आपल्याला बऱयाच गोष्टी शिकवणारही आहेत. पण अनुभवांना सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची सवय आपल्याला करावी लागणार आहे. कारण प्रत्येक पायरी ही आपल्याला एक परिपक्व व्यक्ती म्हणून घडवत जाणार आहे.

अजून एक बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवायचा आहे तो म्हणजे आपल्या विचार आणि त्यातून उत्पन्न झालेल्या भावनांची जबाबदारी घेणं. यासाठीच आपल्याला सजग राहूनच विचार करावे लागणार आहेत. तरच आपल्याला नकारात्मक आणि टोकाचे विचार कमी करता येतील. हे सगळे बदल हे एका रात्रीत होणारे नक्कीच नाहीत. ही एक प्रक्रिया आहे जी आपल्याला न थांबता सुरू ठेवावी लागेल. तरच हळूहळू आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम दिसायला सुरुवात होईल.

शेवटी एक नमूद करावंसं वाटतं… आपल्या हातातून एकदा का वेळ निसटून गेली की पुन्हा येणार नाहीये. आज आपण आपल्या घरी खूप जास्त वेळ राहतोय. चांगली संधी आपल्याला मिळालीय नाती नव्याने शोधण्याची. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी नाती शोधण्यापेक्षा घरातील नात्यांनासुद्धा आपण आपल्या ‘इगो’च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नव्याने शोधू शकतोय. करून बघूया. खूप छान वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पाहिलेली स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील… वास्तवाशी मेळसुद्धा खातील. कदाचित जीवनाचा अर्थही सांगून जातील. मग पडूया ना आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर! ऑल दि बेस्ट!!

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
n [email protected]