। जगी होईजे धन्य या रामनामे।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समर्थ रामदास आपल्या, ‘आपण रामची व्हावे’ या स्फुट रचनेत म्हणतात… ‘रामासी इतुकी मागावे, जे आपण रामची व्हावे, नवविधा भक्ती याची कारणे, जे आपण स्वये रामची होणे, स्वयेची रामपणे ठाकणे, स्वानुभवेकरुनी’ नामाचा महिमा जसा आगाध आहे, तशी  नियमित उपासना, मनसामर्थ्य वाअसते. त्यामुळे मन विकार मुक्त होते. निर्मळ मोकळी –वृत्ती प्राप्त होते. मनाला रामनामाची ओलागल्याने ते दुसऱया कशातही गुंतून पडत नाही. मन उदासीन– अलिप्त होऊन राहते. रामनामातच रामाचे स्मरण दडले आहे. वाल्मिकी रामायण आणि उत्तरकालीन संस्कृत काव्य नाटकात प्रभू श्रीरामचंद्रांचे मानवी आणि संसारी रूप दर्शविले आहे. कुटुंबाच्या, प्रपंचाच्या जीवनपद्धतीत पुत्र, बंधू, पिता, मित्र, स्वामी इत्यादी  जी अनेक नाती सर्वसामान्य माणसाला असतात, त्यात रामाने प्रत्येक नातेसंबंधात एक उंची गाठलेली दिसते. ‘दुःखाची संवेदना होण्यासाठी जणू रामाच्या ठिकाणी चैतन्य ठेवलेले होते’ असे भवभूतीच्या ‘उत्तररामचरितम्’ या नाटकात म्हटले आहे. सामान्य माणसासारखेच रामाच्या वाटय़ासही दुःखे आली. अशा रामाचे स्मरण करणे, रामाकडे आदर्श म्हणून पाहाणे, तसे होण्याचा प्रयत्न करणे हीच  श्रीरामाची उपासना होय. असे राम नाम म्हणजेच रामाचे स्मरण होय.

>> संध्या शहापुरे