
महागडे फेशवॉश, क्रिम्स किंवा विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या पिठाचा हा जादुई फेस पॅक तयार करून चेहऱयावर लावल्यास आरशासारखा तजेलदारपणा येईल.
स्वच्छ आणि कोरडा बाऊल घ्या. या बाऊलमध्ये मोजून 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ टाका. यामध्ये 1 ते 2 चमचे थंड कच्चे दूध किंवा फेटलेले ताजे दही घाला. त्यानंतर यामध्ये 1 चमचा शुद्ध मध मिसळा.
स्वच्छ धुतलेल्या चेहऱयावर आणि मानेवर फेस पॅक लावा. पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने पाण्याचा हात लावून गोलाकार मसाज करत चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.





























































