ब्लॅक फ्रायडे! शेअर बाजार कोसळला!! गुंतवणूकदारांचे दोन लाख कोटी स्वाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी हिंदुस्थानी शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 318 अंकांनी घसरून 81,592 अंकांवर तर निफ्टी 155 अंकांनी घसरून 25,144 अंकांवर बंद झाला. आज दिवसभरात झालेल्या व्यवहारानंतर 1763 शेअर्समध्ये वाढ, 2328 शेअर्समध्ये घसरण तर 167 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला आहे. शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे दोन लाख कोटी रुपये स्वाहा झाले.

शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाल्यासोबत हिंदुस्थानी रुपया 21 पैशांनी घसरून 94.24 प्रति डॉलरवर पोहोचला आहे. निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण झालेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, ग्रासीम इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स पॅसेंजर, व्हीकल्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि अदानी इंटरप्रायजेस या कंपन्यांचा समावेश आहे. तर भारती एअरटेल, आयशर मोटर्स, ओएनजीसी, नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेअर बाजाराला फटका बसला आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती 92 डॉलरने वाढून 95.2 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. सौदी अरबच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ले आणि होर्मूझचे संकट वाढल्याने याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसत आहेत.