
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण 2-3 महिन्यांमध्ये पूर्ण होणे अशक्य असल्याचा दावा ‘सीरम इन्स्टिटय़ूट’चे सीईओ अदर पुनावाला यांनी केला आहे. हिंदुस्थानी नागरिकांच्या लसी परदेशात निर्यात केल्या नाहीत असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
लस निर्मितीमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे जगभरातील लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी अजून 2-3 वर्षे तरी लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

























































