
सर्वाधिक रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 24 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
रमेश पोवार यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली होती. पण रमेश पोवार यांची हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यामुळे आता मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाची जागा रिकामी झाली आहे.
या पदासाठी एमसीएकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱया व्यक्तीने किमान 50 प्रथमश्रेणी सामने खेळलेले असावेत. राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीतून त्याने प्रशिक्षणाची डिग्री मिळवलेली असावी. या व्यक्तीकडे राज्य, आयपीएल किंवा राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीतील कोचिंगचा अनुभव असावा. तसेच तो मुंबईत राहणारा असावा.



























































