लाडक्या लेकीने केला ट्विंकलचा फनी मेक ओव्हर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियाकर ती बऱयापैकी ऍक्टिव्ह आहे. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक भन्नाट सेल्फी पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून ट्विंककलचा हा अवतार कुणी केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. खरंतर ट्विंककल खन्नाच्या लाडक्या लेकीनेच तिचा हा मेकअप केला आहे. यात तिच्या चेहऱयावर वेगवेगळे रंग लागल्याचं दिसतंय. काळ्या रंगाने ट्विंककलच्या दोन्ही भुवया जोडल्या आहेत. तिचा हा फोटो पाहून अनेकांना आधी आश्चर्य वाटलं. मात्र कॅप्शनमधून हा मेकअप मुलगी निताराने केल्याचे तिने म्हटले आहे. ‘‘दुसरा दिवस आणि दुसरा मेकओक्हर. मला शिक्षा भोगावी लागतेय. या चिमुकलीचं मेकअप आर्टिस्ट म्हणून काहीच भविष्य नाही. फनी मेकओव्हर.’’ असं ट्विंकल कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.