
सध्या वेबसिरीजमध्ये कथांचा ट्रेंड दिसत आहे. एकाच विषयसूत्राला धरून त्याभोवती गुंफलेल्या चार कथा हा फॉर्म्युला ओटीटीवर हिट होत आहे. लस्ट स्टोरीज, घोस्ट स्टोरीज, अजीब दास्तान याप्रमाणे आता ‘लक्ह सॉरीज’ ही चार कथांची वेबसिरीज बननण्यात आली आहे. इंदूर येथील गौतम जोशी यांनी क्राऊड फंडिंगमधून सक्का कोटी रुपये जमकून ‘लव्ह सॉरीज’ची निर्मिती केली आहे. यात ‘लव्ह स्टोरी’ नसून ‘लव्ह सॉरीज’ कथा दाखवण्यात आल्या आहेत.
‘लक्ह सॉरीज’ वेबसिरीज एमएक्स प्लेयरसह एकूण 20 डिजिटल प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. स्ट्रॉबेरी, डबल चीज, केसर पिस्ता अशी यातील कथांची नाके आहेत. तर चौथी कथा वेगळ्या थीमवर आहे. ‘लव्ह सॉरीज’ च्या चारही कथांचे शूटिंग मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेले आहे. आजच्या हिंदुस्थानातील प्रेमाचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न वेबसिरीजमधून करण्यात आला आहे. यातील प्रत्येक कथा प्रेक्षकांना प्रश्न विचारते. खरंच प्रेम अक्कल आहे का? प्रेमात कुणी उद्ध्कस्त होतं का? आनंद-दु:ख यांच्याप्रमाणे प्रेम हीदेखील दोलायमान भावना आहे का? गौतम जोशी यांनी प्रत्येक कथेला खाद्यपदार्थाचे नाव देण्याचा अनोखा प्रयोगही करण्यात आला आहे.



























































