
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख हेमंत परब यांची अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे उपप्रमुखासह अग्निशमन दल प्रमुख पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी परिपत्रक काढून दिली आहे.

























































