रत्नागिरीत आजपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आजपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला असून नागरिकांनी कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद होती. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आजपासून 9 जून पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत़. बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. चेकपोस्टवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. सर्व प्रकारची शासकीय आणि खासगी, सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्व प्रकारचे अत्यावश्यक नसणारे उद्योग व त्यांच्या आस्थापना बंद ठेवण्यात आले होते. केवळ अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती, उत्पादन, पुरवठा करणारे उद्योग आणि आस्थापना सुरु होत्या. सर्व पेट्रोल पंप सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरु ठेवण्यात आले होते.

जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार 72 रूग्ण सापडले आहेत. सध्या 4 हजार 248 ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. आतापर्यंत 1259 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 85.53 टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण 3.30 टक्के आहे.