
सध्याच्या जगात ऑनलाईन फूड डिलिव्हरी ही एक आवश्यक बाब झाली आहे. अनेक लोक सध्या या पर्यायाचा वापर करतात. पण, कधी कधी काहींच्या बाबतीत भलतीच गडबड होते. अशीच एक गडबड एका महिलेसोबत झाली आहे.
महिलेने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या फ्राईड चिकनऐवजी तिला भलताच पदार्थ डिलिव्हर करण्यात आला आहे. ही घटना फिलीपाईन्स या देशातील आहे. अलिक पेरेज असं या महिलेचं नाव आहे. तिने आपल्या फेसबुकवर हा प्रसंग फोटोंसहित शेअर केला आहे.
ती लिहिते की, मी माझ्या मुलासाठी ऑनलाईन फ्राईड चिकन ऑर्डर केलं होतं. ऑर्डर आल्यानंतर मी त्याला देण्यासाठी जेव्हा ते कापत होते. तेव्हा मला जाणवलं की तो पदार्थ सहजपणे कापला जात नव्हता. म्हणून मी तो हातांनी तोडून पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ते चिकन नसून तळलेला कापडाचा तोंड पुसायला उपयोगी पडणारा नॅपकीन आहे.
अलिकला हे पाहून धक्काच बसला की कुणीतरी चिकनऐवजी तिला तळलेला नॅपकीन कुणी कसं पाठवू शकतं. अलिकच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला असून तिला या कंपनीवर दावा ठोकण्याचा सल्लाही दिला आहे.


























































